एसटी चालकास मारहाण करणे प्रवाशास पडले महाग; न्यायालयाने सुनावली शिक्षा

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
एसटी बस चालकास केलेल्या मारहाण प्रकरणी प्रवाशाला जिल्हा सत्र न्यायालयाने सहा महिने सश्रम कारावास आणि दोन हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. प्रतिक रमेश शिंदे रा. जोगेश्वरी, मुंबई असे या प्रवाशाचे नाव आहे. सदरचा गुन्हा २२ डिसेंबर २०१९ रोजी दुपारी ०३.०० वा. चे सुमारास गडब गावचे हद्दीत मुंबई गोवा हायवे रोडवर विनायक आत्माराम घुले हे एस. टी. बस नं. एम. एच. ०६/बी ०४९५ ही श्रीवर्धन ते बोरीवली अशी स्वतः चालवित घेवून जात होते. रस्ता खराब असल्याने बस आदळली. यावर बस मध्ये मागे बसलेल्या प्रवासी प्रतिक रमेश शिंदे यांनी चालक आत्माराम घुले यांना गाडी सावकाश चालव, गाडी आपटते असे बजावले. यावरून फिर्यादी व आरोपी यांच्यात बोलाचाली होवून आरोपीने फिर्यादीच्या शर्टची कॉलर पकडून शर्टचे बटन तोडुन शिवीगाळी दमदाटी करीत त्यांना हाताबुक्क्यांनी मारहाण केली.


याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपाखाली आरोपीविरुध्द वडखळ पोलीस ठाणे येथे तकार नोंदविली. त्यानुसार न्यायालयाने आरोपी प्रतिक रमेश शिंदे यास न्यायालयाने आरोपीस दोषी पकडून सहा महिने सक्षम कारावास व दोन हजार रुपयांचा दंड तसेच भा. द. वि. ३३२ प्रमाणे दोषी पकडून जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश अशोककुमार भिलारे यांनी सहा महिने सक्षम कारावास व दोन हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली. सदर खटल्यात अति शासकीय अभियोक्ता ॲड स्मिता राजाराम धुमाळ – पाटील, यांनी एकूण ६ साक्षीदार तपासले व कोर्टासमोर सरकारी वकीलांनी केलेला युक्तीवाद महत्वपूर्ण ठरला. यातील साक्षीदार फिर्यादी विनायक आत्माराम घुले, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार वाहक अमोल मंचकराव थिटे, जगन्नाथ लक्ष्मण चुणेकर, वैद्यकिय अधिकारी डॉ. मानसी कस्तुरे व तपासिक अंमलदार के. ए. पाटील, सहा. फौजदार, वडखळ पोलीस ठाणे यांची साक्ष महत्वाची ठरली.

Exit mobile version