आरोपीने दिली ठार मारण्याची धमकी…

। पेण । वार्ताहर ।
चिंचपाडा, पेण येथील महावितरणच्या कार्यालयातील कर्मचार्‍याला ठार मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद नोंदविण्यात आली आहे. फिर्यादी हे महावितरणच्या कार्यालयात कामकाज करीत असताना महावितरणाचे काम करणारे ठेकेदाराने ऑफिस आवारात आरडाओरडा करून शिवीगाळी केली. त्यावेळी फिर्यादीने शवीगाळी का करता असे विचारले असता दोघांमध्ये वादावादी झाली. त्यावरुन शिवीगाळी केली व कानाखाली मारून धक्काबुक्की केली.पेण पोलिसात तक्रार नोंद झाली आहे.

Exit mobile version