गुरे चोरांच्या मुसक्या आवळल्या

दोन आरोपींना अटक; म्हसळा पोलिसांची कारवाई

| म्हसळा | वार्ताहर |

गोवंश जातीच्या प्राण्यांची कत्तल करण्याच्या उद्देशाने वाहतूक करीत असताना दोन आरोपींच्या मुसक्या म्हसळा पोलिसांनी आवळल्या. या कारवाईदरम्यान 12 खोंड आणि टाटा कंपनीचा टेम्पो जप्त करण्यात आला आहे. गुरेचोरीच्या घटनांमुळे मालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान, म्हसळा पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक सुरेश दिनकर पाळोदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून करण्यात आलेल्या कारवाईत मोबीन अ हसन शेख (30) रा. कुर्ला आणि मिराज अहमद कुरेशी या दोन आरोपीना अटक केली. यामध्ये 5 ते 7 वर्ष वयाचे काळा, सफेद, तांबड्या रंगाचे 12 खोंड गोवंश जातीचे बैल आणि रु. 12 लाख 50 हजार किमतीचा टाटा कंपनीचा टेंपो (एमएच-03-डीव्ही-5514) असा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. म्हसळा साई चेक पोस्ट येथे हवालदारांनी गोरेगावच्या दिशेने भरधाव येणाऱ्या टेपोला अडविण्याचा प्रयत्न करताच पोलीस कर्मचाऱ्यांना दोन्ही आरोपींनी धक्काबुक्की आणि दमदाटी दिली. म्हसळा पोलीस ठाण्याचे सपोनी संदीपान सोनावणे यांना गुन्ह्याचे गांभीर्य कळताच त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत स्वामी यांना हकीगत कळविली. हेड कॉ. संतोष चव्हाण, शिर्के, देवरे, घोंगाणे, सुर्यकांत जाधव, मपोशि वर्षा पाटील, हंबीर श्रीवर्धन पीआय रिकामे, दिघी सागरी पीआय राजेंद्र ढेबे घटनास्थळी पोहोचले. या घटनेतील दोन्ही आरोपींना दोन दिवसाची पोलीस कोठडी मिळाल्याचे तपासी अधिकारी सपोनी संदीपान सोनावणे यांनी सांगितले.

Exit mobile version