अनुजा राणे यांना आचार्य पदवी

| पनवेल | वार्ताहर |

बँक ऑफ महाराष्ट्र पनवेलच्या माजी कर्मचारी राजश्री शिवराज राणे व पनवेल शहरातील सुप्रसिद्ध वकील शिवराज राणे यांच्या सुकन्या वकील अनुजा शिवराज राणे हिने कायदयातील सर्वोच्च आचार्य पदवी प्राप्त केली. अनुजाचा आचार्य प्रबंधाचा विषय “ Emerging perspective on constitutional morality in India : A critical study “ हा होता. सदर आचार्य पदवी ही अमिटी युनिव्हर्सिटी महाराष्ट्र या विद्यापीठातून वकील अनुजा राणेनी प्राप्त केली आहे. ह्या पदवीसाठी डॉ. दीपश्री एस. चौधरी असोसिएट प्रोफेसर यांनी मार्गदर्शन केले.

ह्या तिच्या यशाबद्दल बँक ऑफ महाराष्ट्रचे माजी कर्मचारी, गुणवंत कामगार व विशेष कार्यकारी अधिकारी, अरविंद मोरे व त्यांच्या सुविद्य पत्नी डॉ. प्रा. नीलिमा अरविंद मोरे दाम्पत्यांनी वकील अनुजा राणेचा स्वलिखित पुस्तक कुतूहलाचा करिश्माव पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अरविंद मोरे म्हणाले की, एवढ्या लहान वयात पीएच.डी पदवी प्राप्त करणे ही खरोखर कौतुकास्पद बाब आहे. तिच्या ह्या कर्तृत्वामुळे तरुणाईला नक्कीच प्रेरणा मिळेल. तिच्या ह्या यशामुळे आई-वडील व राणे कुटुंबियांचे तिने नाव लौकिक केले आहे असे उदगारून वकील अनुजाचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी दत्तकुमार सावंत, दिव्या सावंत, स्वाती सावंत आदी नातेवाईक उपस्थित होते.

Exit mobile version