| पनवेल | वार्ताहर |
पनवेल तालुका पोलिस ठाण्यात अधिकारी आणि कर्मचारी यांच्याससह कुटुंबियांसाठी रविवारी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तज्ञ डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या आरोग्य शिबिरात डॉ. गिरीश गुणे आणि त्यांची 20 डॉक्टरांची टीम कार्यरत होती. नवी मुंबई पोलिस आयुक्तालय अंतर्गत परिमंडळ 2, रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल, शंकरा आय हॉस्पिटल आणि डी वाय पाटील हॉस्पिटल ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या सर्वांच्या प्रयत्नातून गेली 9 वर्षे हा उपक्रम आयोजित केला जात आहे.
यावेळी पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांच्यासह भागवत सोनवणे व धनाजी क्षीरसागर, रवींद्र दौंडकर, विजय कादबाने, संजय पाटील, स्मिता जाधव, सुभाष कोकाटे, संदीपान शिंदे यांच्यासह परिमंडळ 2 मधील सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्यासह डॉ.हितेन शहा, डॉ. लक्ष्मण आवटे, प्रेसिडेंट लक्ष्मण पाटील, सेक्रेटरी अनिल ठकेकर यांच्यासह सर्व रोटेरिअन्स, अँस आणि ऍनेट व रोटरॅक्टर्स रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल आदी उपस्थित होते.
दैनंदिन जीवनात कर्तव्य निभावताना पोलीस बांधवांचे शारीरिक स्वास्थ्य तंदुरुस्त असणे आवश्यक आहे. पोलिस खात्यात आरोग्याच्या अनेक समस्या असतात. त्यामुळे पोलिसांच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्य शिबीर हे एक वरदान ठरणार
– शिवराज पाटील , पोलीस उपायुक्त