स्मार्ट टिव्ही शैक्षणिक अभ्यासक्रमाचे उद्घाटन
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
उषःकाल फाऊंडेशन उतेखोल माणगाव या संस्थेच्या वतीने अलिबाग तालुक्यातील वरसोली येथील जिल्हा परिषदे शाळेत डिजीटल उपक्रम पार पडला. यावेळी शाळेसाठी स्मार्ट टिव्ही शैक्षणिक अभ्यासक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच शाळेला महापुरुषांच्या प्रतिमांचे वितरण करण्यात आले.

उषःकाल फाऊंडेशनचे संस्थापक नामदेव शिंदे, सरपंच प्रमिला भाटकर, ग्रामपंचायत सदस्य सुरेश घरत, रोहन शिंदे यांच्या प्रमुख उपस्थित सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्य पूजा खोत, नमिता माळवी, नम्रता वर्तक, ग्रामसेवक अनिल चवरकर, शाळा समिती उपाध्यक्ष ब्रिजेश तांबोली, थळे, सुरज वार्डे, मुख्याध्यापक विकास पाटील, आईएस विद्यालयाच्या मुख्याध्यापिका विश्वासराव, अमोध दिवाण, स्नेहल शिंदे, ग्रामपंचायतीचे अधिकारी नितीन खाडे, स्वप्निल वार्डे, मंगेश घरत आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक विकास पाटील यांनी केले. रोहन शिंदे यांनी उषःकाल फाऊंडेशनच्या स्थापना आणि त्यामागचा उद्देश स्पष्ट केला. ग्रामपंचायत सदस्य सुरेश घरत यांनी उषःकाल फाऊंडेशनच्या कार्याचा गौरव केला. समाजासाठी काहीतरी करण्याच्या उद्देशातून ही संस्था स्थापन झाली. आजच्या उपक्रमातून या संस्थेचे आणि उषाताई शिंदे यांचे नाव चिरंतन राहणार असल्याचे सांगितले. उषाताईंच्या स्मृती जिवंत ठेवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देखील सुरेश घरत यांनी यावेळी दिले. तर उषःकाल फाऊंडेशनचे संस्थापक नामदेव शिंदे यांनी आपल्या भाषणात संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. ही संस्था वरसोली शाळेसाठी सदैव तत्पर राहणार असल्याची ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली. थळे, संतोष गुरव यांनी आपले मनोगत व्यक्त केले.