हल्ल्यात 22 श्वान गंभीर जखमी
| चिरनेर | प्रतिनिधी |
उरण तालुक्यातील वेश्वी-दादर पाडा गावात अज्ञात समाजकंटकांनी 22 कुत्र्यांवर ॲसिड टाकून जखमी केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली आहे. या जखमी कुत्र्यांपैकी तीन कुत्र्यांचा मृत्यू झाला आहे. तर, 19 कुत्र्यांवर उपचार सुरू आहेत.
श्वानप्रेमी सुनील मढवी यांना 21 आणि 22 नोव्हेंबरच्या दरम्यान परिसरातील बऱ्याच कुत्र्यांच्या अंगावर भाजल्याच्या जखमा दिसून आल्या. त्यानंतर त्यांनी याची माहिती हँड्स हेलला दिल्यानंतर 14 कुत्र्यांना पकडून कल्हे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमी कुत्र्यांपैकी तीन कुत्र्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी बुधवारी उरण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस तपास करत आहेत.