कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव

अ‍ॅड. उमेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पुरस्कार प्रदान

। अलिबाग । प्रतिनिधी ।

मधुशेठ ठाकूर, चॅरिटेबल ट्रस्ट अलिबाग, भाई जगताप, मित्रमंडळ रायगड, डॉ. विश्‍वजित दादा कदम युवा मंच, अ‍ॅड. उमेश ठाकूर मित्रमंडळाच्या वतीने सातीर्जेमध्ये युवक मार्गदर्शन तथा गुणगौरव सोहळा बुधवारी आयोजित केला होता. या निमित्त शैक्षणिक क्रीडा, पत्रकारिता, सामाजिक वैदयकीय अशा विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.

काँग्रेसचे युवा नेते अ‍ॅड. उमेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम घेण्यात आला होता. यावेळी शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील, माजी आ. पंडित पाटील, ज्येष्ठ नेते शंकरराव म्हात्रे, शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, जिल्हा परिषद माजी अर्थ सभापती चित्रा पाटील, काका ठाकूर, उमेश ठाकूर, आदी मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

या कार्यक्रमानिमित्त माजी सैनिक ऋषीकेश पाटील, बैलगाडी सम्राट जयेश पाटील, प्रवीण तांबडे, नितीन धनावडे, मोहन जाधव, आनंद तारेकर, अ‍ॅड. रोहन खोपकर, प्रसन्न सुर्वे, दिलीप राऊत, प्राध्यापक डॉ. दत्तात्रय मुरूमकर, रवी जावळे, मुख्याध्यापक प्रमोद भगत, किशोर जैन, डॉ. राहूल म्हात्रे, उमेश कवडे, पुरुषोत्तम मुळे, अब्दूल वहाब अब्दूला मुखी, संग्राम तोगरे, सलीम शेख, संतोष म्हात्रे, विलास खंडेराव, विश्‍वनाथ पाटील, घनश्याम कडू, सायली राऊळ, संजय म्हात्रे, मयंक म्हात्रे, उदय खोत,रमेश म्हात्रे, दिलीप पाथरे, सूनील म्हात्रे, महेश घरत, दर्श नागोटकर, वैभव घरत, अ‍ॅड संदीप जगे, सार्थक गायकवाड, यासीन मर्चंड, संदेश पालकर, सिध्दी नाखवा, राकेश काठे, दिपक पाटील, मल्लिनाथ जमादार, जीवन पाटील, विनोद नाईक, सचिन घाडी, निविता धसाडे, मंदार वर्तक, प्रतीक पाटील, प्रथमेश म्हात्रे, लक्ष्मी पाटील, यशवंत हरेर, दिलदार थळे, तैसीन छापेकर, रितेश मनोरे, संजय पोईलकर, रामचंद्र म्हात्रे, प्रफुल्ल पाटील, कुणाल पाटील, महेश नागावकर, प्रशांत चिंबूलकर, साक्षी पाटील, सूशील वाघमारे, दिव्या मोकल, मोहन पाटील, सुधीर नाईक, किशोर भगत, कृतिका म्हात्रे, अमोद ठक्कर, विवेक जोशी, श्रीकांत घरत, पूर्वा नाईक, प्रांजल घागूर्डे तसेच श्री काळभैरव प्रासादिक भजन मंडळ, शनिवार भजन मंडळ यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच क्रीडा महर्षी स्वर्गीय नथुराम पाटील यांना मरणोत्तर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

Exit mobile version