| अलिबाग | प्रतिनिधी |
शेकाप माजी आ. पंडित पाटील यांचा वाढदिवस सोमवारी (1 मे) विविध सामाजिक उपक्रमानी साजरा करण्यात आला. आंबेपूर येथील निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात आंबेपूर हद्दीतील अपंगांना सरपंच सुमना पाटील यांच्यावतीने कुलरचे वाटप करण्यात आले. पंडित पाटील यांच्या हस्ते याचे वाटप लाभार्थ्यांना करण्यात आले. यावेळी माजी जि.प. सदस्या भावना पाटील, चित्रा पाटील, युवा नेते सवाई पाटील यांच्यासह ग्रा.पं.सदस्य विजय पाटील, अभय पाटील, सुमेध जाधव, वनिता पाटील, ग्रामविकास अधिकारी वैभव ठाकूर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान, वाढदिवसानिमित्त रायगडातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी पंडित पाटील यांना प्रत्यक्ष भेटून तसेच अनेकांनी फोनद्वारे अभिष्टचिंतन केले.