| पनवेल | वार्ताहर |
पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या दोन बांगलादेशी नागरिकांवर पनवेल शहर पोलिसांनी कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेख इकबाल आणि राहुल इकबाल शेख अशी कारवाई केलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत. पनवेल शहर पोलिसांना पुष्पक नगर परिसरात दोन बांगलादेशी नागरिक येणार असल्याची माहिती मिळाली होती. यानुसार पोलिसांनी पुष्पक नगर, सेक्टर 8 येथे सापळा रचून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. दोघांकडे पोलिसांनी कागदपत्रांची मागणी केली असता, एकाने आधारकार्ड सादर केले. यावेळी त्यांची नावे शेख इकबाल भाई नंदूभाई आणि राहुल इकबाल शेख असे सांगण्यात आले. त्याच्याकडे असलेले आधार कार्ड बनावट असल्याचे प्रथम दर्शनी दिसून आले. दोघांकडून पोलिसांनी मोबाईल फोन जप्त केले आहेत.