। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेली कामे व त्या अनुषंगाने निर्माण झालेल्या समस्या निकाली काढण्यासाठी माजी तालुका प्रमुख संदीप सावंत यांनी सावर्डे येथे 21 ऑगस्ट रोजी रास्ता रोकोचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर सोमवारी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात बैठक झाली. या बैठकीत सावंत यांच्या मागण्या मान्य करीत येत्या काही दिवसात त्याची पूर्तता करण्याचे आश्वासन दिल्याने सावंत यांनी आपले आंदोलन स्थगित केले आहे. मात्र, दिलेले आश्वासन मुदतीत पुर्ण न झाल्यास येत्या 2 ऑक्टोबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
या बैठकीला संभाजी पालशेतकर, सीताराम राणे, दिनेश वहाळकर, सोमा म्हालीम, सतीश सावंत, एकनाथ माळी, अरूण जाधव, साबर्डेचे पोलिस निरीक्षक जयंत गायकवाड, इगल कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.