वाहतूक पोलिसांकडून धडक कारवाई

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत शहरात वाहतूक कोंडी सातत्याने होत असून वाहतूक कोंडीमुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्याबद्दल कर्जत शहर आरपीआय आठवले गटाने कर्जत पोलिसांकडे ताक्रारी दाखल केल्या होत्या. त्यानंतर स्वतः प्रभारी पोलीस अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली हि कारवाई सुरू आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी एकेरी वाहतूक व्यवस्था बनविण्यात आली. मात्र, नियम न पाळणाऱ्या वाहनचालकांवर कर्जत पोलिसांकडून कारवाई केली जात आहे.

कर्जत शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राखण्यासाठी आणि एकेरी वाहतुकीच्या नियमांकडे वारंवार दुर्लक्ष करणाऱ्या वाहनचालकांवर वचक बसवण्यासाठी कर्जत पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. कर्जत शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते कर्जत रेल्वे स्थानक या मुख्य रस्त्यावर एकेरी वाहतूकीचे स्पष्ट फलक असूनदेखील अनेक रिक्षा, दुचाकी आणि चारचाकी वाहन चालक या नियमांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे चित्र होते. परिणामी पादचाऱ्यांना चालण्यास देखील जागा राहत नव्हती.

या विषयी कर्जत तालुका आरपीआयच्यावतीने 9 जुन रोजी प्रभारी तालुका अध्यक्ष मनोज गायकवाड, आरपीआयचे पदाधिकारी यांनी कर्जत पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांना निवेदन देऊन विनंती वजा उपोषणाचा इशारा दिला होता. या संदर्भात पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड स्वतः रस्त्यावर उतरून अनेक वाहनांवर ऑनलाईन दंड आकारण्यात आला.

Exit mobile version