उत्खननाविरोधात कारवाई

पनवेल | वार्ताहर |
पनवेल परिसरातील बेकायदा वाळू उत्खननाविरोधात पनवेलचे तहसिलदार विजय तळेकर यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात आली आहे. कामोठे हद्दीत ओहोटीच्या वेळी बोटीच्या सहाय्याने वाळू उपसा होत असल्याची माहिती पनवेल तहसिलला मिळताच तेथे विशेष पथकाने कारवाई करून वाळू उपसा करणार्‍या अंदाजे 5 लाख रूपयांच्या 5 बोटी हस्तगत केल्या आहेत. परंतु या कारवाईच्या वेळी बोटीतील कामगार पसार झाले आहेत.

Exit mobile version