महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपणाचा शुभारंभ
| अलिबाग | प्रतिनिधी |
प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, टीम चित्रलेखा पाटील फॉर एन्व्हायरमेंट आणि लायन्स क्लब ऑफ श्रीबाग यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी (दि.19) महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते वृक्ष लागवडीच्या उपक्रमाचा शुभारंभ झाला.

हा उपक्रम अलीकडच्या काळात वाढते प्रदूषण, पर्यावरणाची होत असलेली हानी, ऑक्सिजनची कमतरता हे सर्व टाळण्यासाठी वृक्ष लागवड काळाची गरज असल्यामुळे राबवण्यात आला. या उपक्रमाला पीएनपी महाविद्यालयाचे संचालक विक्रांत वार्डे, पीएनपी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य रवींद्र पाटील, गबाजी गीते, प्रा. निशिकांत कोळसे, प्रा. दिनेश पाटील, प्रा. गणेश पाटील, प्रा. मिलिंद घाडगे, लायन्स क्लब श्रीबागचे अध्यक्ष नितीन पाटील, निहा राऊत, विजय वनगे, के.डी. पाटील, कला पाटील, निहा घरत, तानाजी भोसले, विद्याधर पैठणकर, विजय पोळ, तन्वी पाटील, सई पाटील, प्रशाली पाटील, विघ्नेश पाटील, हर्ष पाटील हे सहभागी झाले होते. या उपक्रमाचे आयोजन आणि नियोजन “टीम चित्रलेखा पाटील फॉर एन्व्हायरमेंट” या संस्थेकडून करण्यात आले होते. तसेच, या वृक्षारोपण उपक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्वांचे आभार लायन्स क्लबचे उपाध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी मानले.







