फळविक्रेत्यावर कारवाई

| माणगाव | वार्ताहर |

माणगाव शहरातील एका फळविक्रेत्याने मोर्बा रोड परिसरात कचरा टाकल्याचे एका सुजाण नागरिकाच्या निदर्शनास आले. सदर फळविक्रेत्यास विचारणा केली असता त्यांनी सांगितले कि, येथे कचरा टाकू नये असे कोणतेही फलक लावलेले नाही. त्यामुळे आम्ही कचरा टाकत आहोत असे उर्मटपणाची उत्तर देऊन फळविक्रेता निघून गेला. त्यांनतर सदर नागरीकांने नगरपंचायतीत कचरा टाकणाऱ्या गाडीचा फोटो दाखविला. त्यानुषंगाने माणगाव नगरपंचायत मुख्याधिकारी संतोष माळी यांनी दखल घेऊन तात्काळ फळ विक्रेत्याचा शोध घेतला व सदरील फळविक्रेत्यास कार्यालयात बोलवून नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, उपनगराध्यक्ष राजेश मेहता, मुख्याधिकारी, आरोग्य सभापती, पाणी पुरवठा सभापती, नगरसेवक, नगरसेविका यांनी फळविक्रेत्यास जाब विचारला असता त्याने कचरा टाकल्याचे कबूल आले. मुख्याधिकाऱ्यांनी सदरील फळविक्रेत्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार अतुल जाधव ह्यांचे उपस्थित 11 ऑक्टोबर रोजी फळविक्रेत्याने मोर्बा रोड परिसरात टाकलेला कचरा जेसीबी व ट्रॅक्टरच्या साहाय्याने उचलून घेतला.

Exit mobile version