| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव नगरपंचायत महिला व बालकल्याण समितीतर्फे सिने अभिनेते क्रांतीनाना मळेगावकर प्रस्तुत जागतिक महिलादिनी बुधवारी (दि.8) सायंकाळी 5 वाजता अशोकदादा साबळे विद्यालय, माणगाव याठिकाणी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमात माणगाव नगरपंचायत हद्दीतील जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन सभापती नंदिनी बामगुडे, शर्मिला सुर्वे व सर्व नगरसेविका यांनी केले आहे.
या कार्यक्रकामला क्रांतीनाना मळेगावकर, सह्याद्री मळेगावकर या उपस्थित राहून महिलांचे मनोरंजन करणार आहेत. या कार्यक्रमासाठी पहिले बक्षीस पैठणी व आकर्षक भेटवस्तू, दुसरे बक्षीस पैठणी व आकर्षक भेटवस्तू, तिसरे बक्षीस पैठणी व आकर्षक भेटवस्तू, चौथे बक्षीस मिक्सर, पाचवे बक्षीस कुलर अशी आकर्षक बक्षिसे महिलांसाठी ठेवण्यात आली आहेत. या कार्यक्रमाची जोरदार तयारी माणगाव नगरपंचायत महिला व बालकल्याण समितीतर्फे करण्यात आली आहे.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने माणगाव नगरीतील सर्व महिलांना अॅड.राजीव साबळे, नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक आनंदशेठ यादव, उपनगराध्यक्ष सचिन बोंबले, सर्व नगरसेवक, नगरसेविका, मुख्याधिकारी संतोष माळी व सर्व कर्मचारी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.