| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
अलिबाग येथील जे.एस.एम. कॉलेजमध्ये नव्याने बांधण्यात आलेल्या खुल्या रंगमंचाचे उदघाटन जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅड. गौतम पाटील यांचे हस्ते करण्यात आले. लोकनेते अॅड. दत्ता पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
दत्ता पाटील यांची विधानसभेतील भाषणे, निरनिराळ्या प्रसंगी केलेली उस्फुर्त भाषणे व त्यांचे वकृत्व कौशल्य हे सर्वांना कायमच प्रेरणा देणारे राहील. त्यामुळेच खुल्या विचार मंथनास चालना देणारा हा मंच म्हणूनच दत्ता पाटील खुला रंगमंचाचे मी लोकार्पण करीत आहे.
अॅड. गौतम पाटील
या कार्यक्रमाचाच एक भाग म्हणून महाविद्यालयात नव्याने उभारण्यात येणा-या वनस्पती उद्यानाचे भूमिपूजन अॅड. गौतम पाटील व उपाध्यक्षा डॉ. साक्षी पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सेक्रेटरी गौरव पाटील, ज्येष्ठ संचालिका, शैला पाटील, श्री. रघुजीराजे आंग्रे, अॅड. कविता ठाकूर, अॅड. मानसी म्हात्रे, नागेश कुळकर्णी, रंगशारदेचे रंगकर्मी शरद कोरडे, माजी नगरसेविका वृषाली ठोसर, संतोष बोंद्रे, उपप्राचार्या डॉ. सोनाली पाटील, लॉ कॉलेजच्या प्रभारी प्राचार्या अॅड. नीलम हजारे, प्रा. आशुतोष मेंहदळे हे उपस्थित होते.
यावेळी मानसी म्हात्रे यांनी अॅड. दत्ता पाटील यांचाच वारसा घेऊन अॅड. गौतम पाटील हे काम करीत असून गेल्या वर्षभरात त्यांनी कॉलेजचा कायापालट केला आहे असे सांगितले. शरद कोरडे यांनी कै. प्रभाकर पाटील, स्वर्गीय अॅड. दत्ता पाटील यांच्या कार्यावर प्रकाश टाकून त्यांचे संस्कार सर्वांसाठीच आदर्श राहिल्याचे सांगितले. प्राचार्य, डॉ. अनिल पाटील यांनी आभार प्रदर्शन करताना खुल्या रंगमंचाचे वास्तु शिल्पकार अमित चिने यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगितले. तसेच गेल्या वर्षभरात विद्यार्थ्यांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल संपूर्ण संचालक मंडळाचे व अध्यक्ष अॅड. गौतम पाटील यांचे आभार मानले.
खुल्या रंगमंचाचे उद्घाटन झाल्यानंतर जे.एस.एम. कॉलेज व अॅड. दत्तापाटीललॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी रंगारंग कार्यक्रमसादर केला. यावेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते. समृद्धी पाटील, नीलम म्हात्रे, कु.सुरभि वाणी प्राची रानडे, जनरल सेक्रेटरी अनुजा गुरव, चिन्मय राणे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन यशस्वीरित्या केले.