हातभट्टीची दारू बनवणाऱ्यांवर कारवाई

| तळा | प्रतिनिधी |

तळा पोलिसांकडून बोरघर आदिवासी वाडी येथे गावठी हटभट्टीची दारू उध्वस्त करून धडक कारवाई करण्यात आली. बोरघर आदिवासी वाडी येथे राजरोसपणे गावठी हटभट्टीच्या दारूची विक्री केली जात असून या गावठी दारूच्या आहारी जाऊन गावातील अनेक कुटुंब उध्वस्त झाली आहेत. तसेच तरुण व अल्पवयीन मुले देखील या दारूच्या आहारी जाऊ लागल्याने बोरघर आदिवासी वाडीतील महिलांनी गावठी दारूचे धंदे बंद करण्यात यावेत याबाबत तळा पोलिस ठाण्याला निवेदन देण्यात आले होते. त्यानुसार तळा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत बोरघर येथे धाड टाकून गावठी हातभट्टीची दारू उध्वस्त केली. याप्रसंगी तळा पोलीस ठाण्याचे पीएसआय काळे, फाटक, वारगुडे, सुरवसे, बाद्रे आदी उपस्थित होते.

Exit mobile version