रत्नागिरीमध्ये बेकायदेशीर जुगाराविरुद्ध कारवाई

। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
शहरातील एसटी स्टँडलगत तसेच काजरघाटी येथील एसटी स्टॉपच्यामागे बेकायदेशिरपणे जुगार चालविणार्‍या दोघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी संशयितांकडून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य असा एकूण 3 हजार 20 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आशिष लांजेकर आणि संदिप चंदरकर अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.

Exit mobile version