रात्री उशिरा पर्यंत पार्टी करणार्‍यांविरुद्ध कारवाई

। पनवेल । वार्ताहर ।

टेरेसवर मध्यरात्री उशिरापर्यंत मोठमोठ्याने वाद्य कशी वाजवून पार्टी साजरी करणे कळंबोलीतील एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. थर्टीफर्स्टच्या रात्री 12 वाजेपर्यंत वाद्य वाजवण्याची परवानगी असताना, या व्यक्तीने 12.55 वाजेपर्यंत इमारतीच्या टेरेसवर विनापरवानगी जोरजोरात वाद्य वाजवून पार्टी साजरी केली. या त्यामुळे कळंबोली पोलिसांनी पार्टीच्या आयोजकावर मनाई नी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

कळंबोली सेक्टर-4 मधील साईनगर सोसायटीत राहणार्‍या समशेर शमशाद सिद्दिकी (42) याने आपण राहत असलेल्या इमारतीच्या टेरेसवर पार्टीचे आयोजन केले होते. त्यानंतर त्याने मध्यरात्री 12 नंतर वाद्य वाजवण्यास परवानगी नसताना, 12.55 वाजेपर्यंत जोरजोरात वाद्य वाजवून पार्टी साजरी केली. यावेळी कळंबोली पोलीस ठाण्यातील ध्वनी प्रदूषण व विहीत वेळेनंतर फटाके फोडणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी तयार करण्यात आलेले पोलिसांचे विशेष पथक या ठिकाणी आल्यानंतर त्यांना साईनगर सोसायटीच्या टेरेसवर सुरू असलेल्या पार्टीचा गोंगाट ऐकू आला. त्यानंतर पोलिसांचे पथक या इमारतीच्या टेरेसवर पोहोचले असता, या ठिकाणी 15 ते 20 महिला-पुरुष मोठ्याने वाद्य लावून नाचत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी ही वाद्य बंद करण्यास लावले. त्यानंतर या पार्टीचे आयोजक समशेर सिद्दिकी याच्याविरोधात मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकणी गुन्हा दाखल केला.

Exit mobile version