श्रीलंकेच्या खेळाडूंवर कारवाई

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

श्रीलंकेच्या दोन खेळाडूंवर आयसीसीकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. यामधील एका खेळाडूला काही सामन्यांसाठी निलंबित करण्यात आले आहे. श्रीलंका क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू वानिंदू हसरंगाने गतवर्षी 15 ऑगस्टला कसोटी क्रिकेटमधून संन्यास जाहीर केला होता. पण नंतर त्याने आपला निर्णय माघारी घेतला होता. बांगलादेशविरोधातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत त्याला समाविष्ट करुन घेतलं होते. 22 मार्चपासून ही मालिका सुरु होणार आहे. पण त्याआधीच आयसीसीने वानिंदू हसरंगानेवर कारवाई केली आहे. यामुळे तो आगामी मालिकेत खेळू शकणार नाही.

हसरंगावर कारवाई
वानिंदू हसरंगाने कसोटी मालिकेआधी बांगलादेशविरोधातील एकदिवसीय मालिका खेळली. या मालिकेतील तिसर्‍या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात त्याने आयसीसीच्या नियमाचं उल्लंघन केले. यावेळी वानिंदू हसरंगाने अम्पायरकडून टोपी खेचून घेतली आणि त्यांची खिल्ली उडवली. यामुळे त्याचे 8 गुण कमी करण्यात आले आहेत. तसेच बांगलादेशविरोधातील मालिका खेळू शकणार नाही.

कुसलवर कारवाई
श्रीलंकेचा कर्णधार कुसल मेंडिसवरही कारवाई करण्यात आली आहे. तिसर्‍या सामन्याच्या शेवटी अम्पायरशी हात मिळवत असताना गैरवर्तन केल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली. 50 टक्के दंड आणि तीन डिमेरिट गुणांसह ही कारवाई करण्यात आली. आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान खेळाडू, पंच किंवा सामनाधिकारी यांच्या वैयक्तिक गैरवर्तनाशी संबंधित आहे. हसरंगा आणि मेंडिस या दोघांनीही आपली चूक मान्य केली आहे.

Exit mobile version