| पनवेल | वार्ताहर |
पनवेल परिसरात अनधिकृत गौण खनिज वाहतुकी प्रकरणी अपर तहसील कार्यालयाकडून कारवाई सुरू आहे. एप्रिल 2025 ते जूनपर्यंत तहसील कार्यालयाने 33 वाहनांवर कारवाई केली. या कारवाईत 12 वाहन चालकांकडून 27 लाख 49 हजार 490 रुपयांचा दंड जमा करण्यात आला आहे. 15 वाहन चालकांकडून दंड भरणे बाकी आहे. तर पाच वाहनांकडे वाहतूक पास असल्याने त्यांना मुक्त करण्यात आले आणि डेब्रिज असल्याने एक वाहनाला मुक्त करण्यात आले. अशा प्रकारे अनधिकृत गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई सुरू राहणार असल्याचे अपर तहसीलदार जितेंद्र इंगळे यांनी सांगितले.