। कर्जत । वार्ताहर ।
शहरात नो एन्ट्रीमधून प्रवास करणार्यांवर कर्जत पोलिसांकडून कारवाई दंडात्मक कारवाईला सुरुवात झाली असून एका दिवसात 80 जणांवर करवाई करून 41,500 दंड वसूल करण्यात आला आहे. कर्जत शहर बचाव समितीच्या आंदोलनाची प्रशासनाकडून दखल घेण्यात आली आहे.
कर्जत शहरात होणार्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करीत प्रशासनाकडून शहरात मुख्य बाजारपेठेत वन वे वाहतूक सुरू करण्यात आली आहे. वन वे वाहतूक सुरू केल्यापासून मोठ्या वाहनचालकांची बाजारपेठेत वाहन आणण्याची संख्या कमी झाली असल्याने वाहतूक कोंडी होत नसल्याचे दिसून येत आहे. मात्र तरीही काही दुचाकी वाहनचालक नो एंट्रीमधून प्रवास करत आहेत.
त्यांच्यावर सोमवारी (दि.30) कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलीस हवालदार दिपक साटोटे अणि वाहतूक पोलीस हवालदार गणेश बोर्हाडे यांनी ही धडक कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये नो एन्ट्री प्रवास करणार्या वाहनांचा परवाना तसेच वाहनांची इतर कागदपत्रे तपासण्यात आली आहे आहेत. या कारवाईमध्ये 80 केसेस केल्या असून रुपये 41 हजार 500 इतका दंड वसूल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरातील वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा मिळणार आहे.