| कर्जत | वार्ताहर |
कर्जत शहरात नो एन्ट्रीमधुन प्रवास करणार्यांवर कर्जत पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत असुन वाहन चालकांना चाप बसत नाही वाहनचालकांमध्ये जनजागृतीकरता चक्क नो एन्ट्री फलकाच्या समोर कर्जत पोलीस ठाण्याचे अधिकारी, वाहतूक पोलीस कर्मचारी उभे राहिले होते. कर्जत शहरात होणार्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करीत प्रशासनाकडून शहरात मुख्य बाजारपेठेत वन वे वाहतूक सुरू केली आहे. मात्र तरीही काही दुचाकी वाहनचालक नो एंट्रीमधून प्रवास करत आहेत. अनेकांवर वाहतूक पोलीस कर्मचारी कारवाया केल्या, कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील चव्हाण, वाहतूक पोलीस शाखेचे पोलीस गणेश बोर्हाडे हेच बाजारपेठेतील नो एंट्री फलकाजवळ उभे राहून कर्जतकरांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करत होते.