| पनवेल | वार्ताहर |
सिडको महामंडळाने संपादित केलेल्या जमिनीवर तसेच संपादित करण्यात येत असलेल्या भूखंडावर अनधिकृतपणे डेब्रिज टाकणार्यांविरुध्द धडक कारवाई केली आहे.
सिडको महामंडळाने संपादित केलेल्या तसेच संपादित करण्यात येत असलेल्या भूखंडावर मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे डंपर वाहन चालकाकडून डेब्रीज टाकण्यात येत असून, सदरचे डेब्रिज हे मानवी आरोग्यास धोकादायक व पर्यावरणास हानिकारक असल्याचे निदर्शनास आले आहे. अनधिकृत डेब्रीजला आळा घालण्याच्या दृष्टीने मुख्य दक्षता अधिकारी, सिडको यांच्या नेतृत्वाखाली दक्षता तपास अधिकारी, सुरक्षा विभाग, अभियांत्रिकी विभाग व पोलीस विभाग यांचेसह सिडको कार्यक्षत्रात मोहीम राबवत असताना एक ट्रक हा सिडको भूखंड क्र. 41, सेक्टर क्र. 17, नवीन पनवेल पश्चिम नवी मुंबई येथे मानवी जीवितास/लोकांच्या आरोग्यास धोकादायक असलेले डेब्रिज/माती मोकळ्या जागेमध्ये खाली करीत असताना मिळून आला. यावेळी ट्रक चालकाविरुद्ध कामोठे पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.