। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
आयपीएल स्पर्धेतीधल 31 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात झाला. मंगळवारी (दि.17) कोलकाताच्या घरच्या मैदानावर म्हणजेच ईडन गार्डन्सवर झालेल्या या सामन्यात राजस्थान रॉयल्सने 2 विकेट्सने रोमांचक विजय मिळवला.
दरम्यान, कोलकाताला या सामन्यातील शेवटच्या चेंडूवर पराभवाचा धक्का तर बसलाच, पण आता कर्णधार श्रेयस अय्यरवरही मोठी कारवाई करण्यात आली आहे. या सामन्यात कोलकाता संघाकडून निर्धारित वेळेत षटके पूर्ण करण्यात न आल्याने बीसीसीआयकडून श्रेयस अय्यरला 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
आयपीएलच्या प्रसिद्धी पत्रकात माहिती देण्यात आली आहे की, आयपीएलच्या आचार संहितेतील षटकांच्या गतीबाबतच्या नियमाचा भंग करण्याची ही कोलकाता नाईट रायडर्स संघाची पहिलीच वेळ आहे. त्याचमुळे यावेळी कर्णधार श्रेयस अय्यरवर 12 लाखांचा दंड ठोठावण्याच आला आहे.







