जम्मू-काश्मीरमध्ये एनआयएकडून कारवाई

14 जिल्ह्यांमधील 45 ठिकाणांवर धाडी
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रीय सुरक्षा तपास यंत्रणेने (एनआयए) दहशतवादी निधी पुरवठा प्रकरणी 14 जिल्ह्यांमध्ये धाड टाकली. जमात-ए-इस्लामीच्या सदस्यांच्या एकूण 45 ठिकाणांवर या धाडी टाकण्यात आल्या आहेत. जम्मू काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफच्या मदतीने एनआयएकडून ही कारवाई करण्यात आली.

पाकिस्तानला तसंच फुटीरतावाद्यांना समर्थन करणार्‍या जमात-ए-इस्लामी संघटनेवर केंद्र सरकारने 2019 मध्ये बंदी टाकली आहे. बंदी असतानाही जमात-ए-इस्लामीकडून सुरु असलेल्या कारवाया रोखण्यासाठी एनआयएकडून हे छापे टाकण्यात आले आहेत. या धाडी टाकण्याआधी दिल्लीमधून वरिष्ठ अधिकारी आणि त्यांची टीम श्रीनगरला रवाना झाली.

Exit mobile version