श्रीनगर | वृत्तसंस्था |
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलाने जोरदार मोहिम उघडली आहे. जम्मू-काश्मीरमधील नागबेरन त्राल येथील जंगल परिसरात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलाने जैश-ए-मोहम्मद तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. दरम्या, गुरुवार झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले होते.
अवंतीपोरामधील नागबेरन त्राल जंगल परिसरात दहशतवादी लपले असल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली होती. त्यानुसार जम्मू-काश्मीर पोलिस आणि सैन्यदलांनी संयुक्त शोधमोहिम राबवली. जवानांनी दहशतवाद्यांना शरण येण्याचे आवाहन केले. यावेळी दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. जवानांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले यामध्ये जैश-ए-मोहम्मदचे तीन दहशतवादी ठार झाले.