गावठी दारू बाळगल्या प्रकरणी कारवाई

| तळा | वार्ताहर |

तळा तालुक्यातील मौजे बोरभाटळा आदिवासी वाडी येथे गावठी हातभट्टीची दारू बाळगल्या प्रकरणी तळा पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, बोरभाटळा आदिवासी वाडी येथे मोठ्या प्रमाणावर गावठी हातभट्टीच्या दारूची विक्री होत असल्याची माहिती तळा पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक कैलास डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली याठिकाणी पोलिसांनी धाड टाकली असता आरोपी राजू सिताराम हिलम हा बेकायदा गावठी हातभट्टीची दारू बाळगल्या स्थितीत मिळून आला. याबाबत पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक कैलास डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक ख्रिरीट हे करीत आहेत.

Exit mobile version