अतिक्रमण विभागाची हातगाड्यांवर कारवाई

12 हातगाड्या तोडल्या

। पनवेल । वार्ताहर ।

कळंबोली वसाहतीत अनधिकृत हातगाड्यांवर पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकातर्फे कारवाई करण्यात आली. अधीक्षक अरविंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या कारवाईत शहरातील 12 हातगाड्या तोडण्यात आल्या असल्याची माहिती अधीक्षक पाटील यांनी दिली आहे. पालिकेच्या माध्यमातून कळंबोली वसाहतीत सध्या रस्ते आणि गटारांचे काम सुरु आहे. या कामामुळे रस्त्यावरील वाहतुकीत अडचणी येत असून अनेकदा वाहतूक कोंडी होत आहे. शहरात हातगाड्यांवर बेकायदेशीरपणे व्यवसाय करणारे व्यावसायिक जागा मिळेल त्या ठिकाणी व्यवसाय करीत आहेत. पालिकेच्या अतिक्रमण विभागाने हातगाड्यांवर कारवाई करून नागरिकांची वाहतूक कोंडीतून मुक्तता करावी अशी मागणी करण्यात आल्याने अतिक्रमण विभागामार्फत कारवाई करण्यात आली.

Exit mobile version