। उरण । वार्ताहर ।
उरणमधील हमरस्त्यावर हातगाड्यांचा विळखा पडला आहे. त्यामुळे प्रामुख्याने वाहतूककोंडी व पादचार्यांना चालणे मुश्किल बनले आहे. सिडकोकडून अनेकवेळा कारवाई करूनही पुन्हा जैसे थे परिस्थिती होत आहे. तरी या हातगाड्यांवर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन डाऊर यांनी केली आहे.
उरणमध्ये प्रवेश करताना उरण चारफाटा येथून सिडकोच्या जागेवर अतिक्रमण करून पूर्णपणे शहरात बेकायदेशीररित्या सार्वजनिक रस्त्यावर हातगाड्या भररस्त्यावर उभ्या करून व्यवसाय करीत असल्याचे चित्र पहावयास मिळते.अनेकजण चारचाकी व मोटारसायकल लावूनच खरेदी करताना दिसतात.त्यामुळे वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. काहीवेळा तर यावरून बोलाचाळीचे रूपांतर हाणामारीत झाले आहे. तरी पोलिसांनी संबंधितांवर कडक कारवाई करून रस्ता मोकळा करण्यात यावा अशी मागणी डाऊर यांनी उरण पोलीस स्टेशनला केली आहे.