पनवेलमधील ‘या’ बारवर कारवाई; 32 जणांविरोधात गुन्हे दाखल

। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल जवळील कोन परिसरात असलेल्या साई निधी- टोपाज लेडिज बारवर पनवेल तालुका पोलिसांनी कारवाई करीत महिला वेटर, मॅनेजर व ग्राहकांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. बार हा विहित वेळेत बंद करून ग्राहकांसाठी गुप्त पद्धतीने पुन्हा चालू करून शासनाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करण्यात आले होते. तसेच बारमधील महिला वेटर या पुरूष ग्राहकांसोबत अश्‍लील चाळे करीत असल्याचे दिसून आले. त्यामुळे बारमधील एकूण 32 जणांविरुद्ध ही कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई अ.मा.वा.प्रति.कक्ष गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक पराग सोनावणे, रविंद्र दौंडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षरक प्रशांत शिर्के, पोलीस उपनिरीक्षक उमेश भुटाळ व त्यांच्या पथकाने केली.

Exit mobile version