अवैध गावठी दारूच्या भट्ट्यांवर कारवाई

| पाली/गोमाशी | वार्ताहर |

सुधागड तालुक्यातील उसर ठाकूरवाडी येथे डोंगराळ भागात गावठी दारू तयार करण्याच्या भट्ट्या लावल्या जात असल्याबाबत गुप्त माहिती पाली पो. शिपाई बीट मार्शल व जनरल ड्युटी अंमलदार अतुल चंदनशिवे यांना मिळताच तात्काळ पाली पो. निरीक्षक सरिता चव्हाण यांच्याशी संपर्क साधून पो. निरीक्षक चव्हाण यांनी आपले सहकारी पी.एस.आय. भास्कर गच्चे, दिनेश घाडगे, धर्मेंद्र म्हात्रे यांना घेऊन गुरुवारी (दि.4) उसर ठाकूरवाडी येथील अवैध गावठी धंद्यावर कारवाई करण्यात आली.

या ठिकाणी बेवारस स्थितीत दारूसाठी लागणारे साहित्य प्रत्येकी 500 लि. क्षमतेच्या दोन टाक्या व प्लास्टिकच्या 200 लि. क्षमतेच्या तीन टाक्या त्यामध्ये एकूण 1600 लिटर गावठी हातभट्टीची दारू तयार करण्याचे गुळ, नवसागर मिश्रित पिवळ्या रंगाचे रसायन प्रति लिटर पन्नास रुपये प्रमाणे एकूण 80,000 रुपये तसेच 500 लिटर क्षमतेचे जर्मनचे पातेले घटनास्थळी उध्वस्त करण्यात आले.

सदर पाच प्लास्टिकच्या टाक्यामधील गुळ नवसागर, मिश्रित पिवळ्या रंगाचे रसायन वाहतुकीस अवजड व गैरसोयीचे असल्याने सदर टाक्यांपैकी एका टाकीमधून मा. न्याय सहा वैद्यकीय प्रयोगशाळा कलीना येथे तपासणी करता 180 मिली लिटर मिश्रित रसायन प्लास्टिक बाटलीत काढून त्यावर पंच अशोक मारुती दळवी, पोलीस पाटीलआपटवणे यशवंत तुकाराम चोरगे ,पोलीस पाटील सिद्धेश्‍वर खुर्द व पोलिसांच्या सह्यांचे कागदी लेबल लावून सदर मिळून आलेल्या टाक्या तोडफोड करून जागीच नष्ट करण्यात आल्या पुढील तपास पाली पोलीस स्टेशन करीत आहे

पाली पोलीस स्टेशनच्या या कारवाईमुळे छुप्या धंद्यांना लगाम लागून अनेक उध्वस्त होणार्‍या कुटुंबाचे रक्षण होईल याची खात्री महिलावर्गांना वाटत आहे.

समृद्धी यादव
सामाजिक कार्यकर्त्या
Exit mobile version