बारा जणांवर गुन्हा दाखल
। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल जवळील कोन येथील साई पॅलेस बिंदास बार अँड ऑर्केस्ट्रावर पनवेल तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईत बार मालक, मॅनेजर, पुरुष वेटर, महिला सिंगर अशा बारा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोन गाव येथील साई पॅलेस बिंदास बार अँड ऑर्केस्ट्रा येथे रविवारी (दि.15) मध्यारात्रीच्या सुमारास सात महिला सिंगर भडक वेशभूषा करून बारमध्ये सुरू असलेल्या म्युझिकच्या तालावर गिर्हाईकांची लगट साधून अंगविक्षेप करून भिभत्स वर्तन करताना आढळून आल्या. शासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केले गेल्यामुळे बारचे मालक बाबुराव तुकाराम म्हात्रे, मॅनेजर मोहन केंगे गौडा व पुरुष वेटर यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी त्यांना तशी परवानगी, उत्तेजन व प्रोत्साहन दिले असल्याची माहिती समोर आली. या प्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.