नियमांचे उल्लंघन करणार्‍यांना दंड

कर्जतमध्ये वाहतूक पोलिसांकडून कारवाई

| कर्जत | प्रतिनिधी |

कर्जतमध्ये वाहनांवर वाहतूक पोलीस कर्मचार्‍यांनी कडक कारवाई मोहीम सुरू केली आहे, त्यामुळे वाहन चालकांनी नियम पाळून वाहन चालवावे नाही तर आपल्यावरही होऊ शकते दंडात्मक कारवाई.

वाहनांवर नंबर प्लेट नसणे, लायन्सस नसणार्‍यांवर कर्जत वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. शाळेमध्ये येताना अनेक विद्यार्थी बाईक घेऊन येतात. अनेकांच्या गाड्यांवर नंबर प्लेट नाहीत, काही विद्यार्थ्यांना 18 वर्ष पूर्ण नाही, काहीजण उगाचच शाळेसमोरील रस्त्यावर बाईकवर फेर्‍या मारत असतात, तर काही विद्यार्थी शाळेसमोरील परिसरात गप्पा मारत उभे असतात, त्यामध्ये मुलींचा समावेश असतो. अशा विद्यार्थ्यांवर वचक राहण्यासाठी कर्जतमध्ये शाळेच्या वेळेत वाहतूक कर्मचारी उभे राहून वाहन चालकांवर कारवाई करत आहेत.

वाहतूक सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मुकुंद दरेकर, वाहतूक महिला पोलीस कर्मचारी मनाली सोनावणे आणि गणेश बोराडे यांनी गुरुवार (दि.24) दुपारपर्यंत 12 जणांवर दंडात्मक कारवाई करून सहा हजार रुपयांची भर शासनाच्या तिजोरीत केली आहे.

Exit mobile version