नवीन पनवेल येथे हुक्का पार्लरवर कारवाई

। पनवेल । प्रतिनिधी ।

नवीन पनवेल सेक्टर 1 या ठिकाणी सुरु असलेल्या हुक्का पार्लरवर खांदेश्वर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. याप्रकरणी राजेंद्र दत्ताराम तेली (सेक्टर 12 खारघर) आणि जितेन विनोद शहा (रत्नेश अपार्टमेंट, लाइन आळी, पनवेल) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिंट कॅफे, सिडको आफिसच्या मागे सेक्टर 1, नवीन पनवेल या ठिकाणी तंबाखूयुक्त हुक्का पुरवला जात असल्याची माहिती खांदेश्वर पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत त्या ठिकाणी आढळून आलेले तंबाखूयुक्त हुक्का फ्लेवरचे पॅकेट, निकोटीन हुक्का फ्लेव्हरचे पॅकेट पोलिसांनी जप्त केले आहेत.

Exit mobile version