पनवेल रेल्वे स्थानकाजवळ गांजा सेवन करणाऱ्या तरुणावर कारवाई


|पनवेल | प्रतिनिधी|

पनवेल शहर पोलिसांनी रेल्वे स्थानकाबाहेरील सर्कल परिसरात गांजा सेवन करणाऱ्या एका तरुणावर कारवाई केली असून, त्याच्याविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षद जाधव, रा. मालधक्का रोड, पनवेल याला पनवेल रेल्वे स्थानकाबाहेरील सर्कल परिसरात गांजाचे सेवन करताना रंगेहाथ पकडण्यात आले. आरोपीकडे गांजाची पाने व फुले असलेला अमली पदार्थ आढळून आला. तो चिलममध्ये भरून त्याचे सेवन करत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून,  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पनवेल शहर पोलीस करीत आहेत.

Exit mobile version