अलिबागमधील एसटी स्टॅन्ड परिसरात गजरे विक्रेत्यांवर कारवाई

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

अलिबाग शहरातील मुख्य रस्त्यावर अनधिकृतपणे फुटपाथची जागा वापरून गजरे विकणार्‍यावर नगरपरिषदेच्या अतिक्रमण पथकाने कारवाईचा बडगा उचलला आहे. त्यामुळे हा फुटपाथ पादचार्‍यांसाठी मोकळा झाला आहे. अलिबाग नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी अंगाई साळुंखे याच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली आहे.


एसटी आगाराच्या बाहेरील फुटपाथ हा पादचारी यांच्यासाठी बांधण्यात आला होता. मात्र या जागेवर गेली अनेक वर्ष गजरे विकणार्‍यानी अनधिकृतपणे ताबा मिळवला होता. गजरे विकणार्‍या कुटुंबांनी आपल्या व्यवसाय सोबत तिथेच आपला संसार थाटला होता. त्यामुळे शहराच्या सुरुवातीलाच गजरे विकणार्‍याच्या अस्वच्छतेचे प्रतीक उमटलेले दिसायचे. अनेक वेळा या गजरे विकणार्‍याना या जागेवरून हटविण्यात आले होते. अखेर गुरुवारी (दि.22) मुख्याधिकारी अंगाई साळुंखे याच्या आदेशाने अतिक्रमण पथकाने ही कारवाई केली. पोलिसांच्या उपस्थितीत बनविलेले अतिक्रमण पथकाने हटवले आहे. त्यामुळे ही जागा मोकळी झाली आहे.

Exit mobile version