| पनवेल | वार्ताहर |
तळहातावर हिरवट मळकट रंगाची पाने फुले असलेला गांजा हा अंमली पदार्थ जवळ बाळगल्याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी तिघांविरुद्ध कारवाई केली आहे.
न्यू सिटी हॉस्पिटल पब्लिक टॉयलेट जवळ अशा प्रकारचे काही व्यक्ती गांजा जवळ बाळगून असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांना मिळताच त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अभंग परांगे, पोलीस शिपाई सुधाकर जाधव व पथकाने या ठिकाणी जाऊन शाहिद शेख (32), रोशन भालेराव (25) व समीर शेख (20) या तिघांविरुद्ध अंमली पदार्थ विरोधी जवळ बाळगल्याप्रकरणी कारवाई केली आहे.







