| पनवेल | वार्ताहर |
टाटा कंपनीच्या मालाची विक्री करण्यासाठी अधिकार किंवा परवानगी नसतानाही परस्पर सदर मालाची विक्री केल्याप्रकरणी दोघा जणांविरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परशुराम कारंडे हे ईआयपीआर इंडिया लि. कंपनीत नोकरीस असून, त्यांच्या कंपनीस टाटा डीईएफ कंपनीने स्वामीत्व दिलेले आहे. त्यांच्या कंपनीच्या वतीने इतर कोणत्याही कंपनीस टाटा डीईएफ कंपनीचा माल विक्री करण्याची परवानगी किंवा अधिकार प्रदान केलेले नसतानाही गव्हाण फाटा येथील मंगल ऑटो मोबाईल व स्वराज्य ऑटो मोबाईल या ठिकाणी आरोपी मंगलसिंग कृपालसिंग (52) व मारुती सुर्वे (54) यांनी त्यांच्या दोन्ही शॉपमध्ये अनुक्रमे टाटा डीईएफ कंपनीचे रसायन असलेल्या मूळ उत्पादनाशी मिळत्या जुळत्या बनावट असा एकूण 33 हजार 750 रुपये किमतीचा माल जो बकेटमध्ये भरलेला होता. एकूण 25 बकेट या दोन्ही ठिकाणांवरुन हस्तगत करण्यात आले असून, सदर बकेट हे बनावट असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरोधातपनवेल शहर पोलिसांनी कारवाई केली आहे.