माणगावमध्ये ॲक्टिवाला अपघात; दोघे जखमी

| माणगाव । वार्ताहर ।

माणगावपासून दोन किमी अंतरावर असणार्‍या मुगवली फाट्याजवळ मुंबई-गोवा महामार्गाजवळ टेम्पोची ॲक्टिवा गाडीला धडक बसल्याने झालेल्या अपघातात अँक्टिवा चालकासह दोन जण जखमी झाले. सदरील अपघात रविवार (दि.23) रोजी पहाटे 5:20 वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघाताची फिर्याद दिव्या मनोहर रेशीम (26) रा. वडवली-महाड यांनी माणगाव पोलीस ठाण्यात दिली.

सदर अपघाताच्या गुन्ह्याबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, आरोपी चालक अल्ताफ हुसेन अब्दुल रहेमान शेख (54) रा. अहमदाबाद-गुजरात यांनी आपल्या ताब्यातील टेम्पो अचानक विरुद्ध दिशेला वेगाने चालवत ॲक्टिवाला धडक दिली. या अपघातात ॲक्टिवावरील दिव्या मनोहर रेशीम व त्यांच्या वाहिनी साधना संतोष रेशीम या दोघी जखमी होऊन स्कुटीचे नुकसान झाले. या अपघाताच्या गुन्ह्याची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या अपघाताच्या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार श्री. पवार हे करीत आहेत.

Exit mobile version