रामराज मोहल्ला येथील कार्यकर्त्यांचा शेकापक्षात प्रवेश

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील रामराज मोहल्ला येथील कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने शेकापक्षाच्या कार्यपद्धतीवर विश्‍वास दाखवत आज पक्षाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून प्रवेश केला. शेकापक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत केले. यावेळी शेकाप महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील, माजी उपसभापती संदीप घरत, पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाष वागळे, तालुका उपचिटणीस अरुण भगत, पुरोगामी युवक संघटनेचे तालुका अध्यक्ष विक्रांत वार्डे, रामराजचे सरपंच हिराजी काष्टे, उपसरपंच गणेश धुमाळ, माजी सरपंच नंदकुमार गावडे, यांच्यासह नितीन पालकर, चंद्रकांत बामणे, सोहम वागळे, विनीत झावरे, उल्हास चाचड, अनिल कनोजे, कृष्णा साकोरकर, प्रदीप रसाळ, सिद्धांत वागळे, महेश जवके आदी उपस्थित होते.
शेकापक्षामध्ये प्रवेश करणार्‍यांमध्ये नासिर गनी बेबन, किफायत अकिल पटेल, नासिर अकिल पटेल, फरहान अजिज दळवी, राहील कादीर पटेल, नौसीन समीर फक्की, इरशाद अशरफ दापोलकर, यासीन जलिल दापोलकर, अलताफ लतिफ खान, सईद बशीर चोगले, सलाम शब्बीर पटेल, फैमिद राजू मिश्रीक, मुद्दशीर मुफीद खान, इमाद इब्राहीम बेबन, समीर सुलतान पाटील, सलमान सुलतान पाटील, अमिर अब्दल पठाण, सरफराज मजिद सय्यद, मुशरफ अकिल पटेल, इमाम शब्बीर पटेल, अकिल शरीफ पटेल आदींचा समावेश आहे.

Exit mobile version