मुरूडमध्ये शिंदे गटात भगदाड

आदिवासीवाडीवाडीमधील असंख्य मंडळी शेकापमध्ये

। अलिबाग । प्रतिनिधी ।

मुरूड तालुक्यातील शिघ्रे येथील आदिवासीवाडीमधील असंख्य कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला आहे. शिंदे गटातील पदाधिकार्‍यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून त्यांनी शेकापच्या कार्यप्रणालीवर खुश होऊन हा प्रवेश केला. शेकापच्या वतीने या सर्व कार्यकर्त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

मुरूड तालुक्यातील अनेक गावे, वाड्या शेतकरी कामगार पक्षात प्रवेश करू लागले आहेत. शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यप्रणालीवर खुश होऊन तरुण, ज्येष्ठ नागरिक, महिला पक्षात प्रवेश करत आहेत. शेकापच्या अधिकृत उमेदवार चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून कार्यकर्ते वेगळ्या उत्साहाने कामाला लागले आहेत. वेगवेगळ्या गावातील कार्यकर्ते शेकापमध्ये येत आहेत. त्यामुळे पक्ष वाढीला अधिक गती मिळू लागली आहे. मुरूड तालुक्यातील शिघ्रे आदिवासीवाडीमधील असंख्य तरुणांसह त्यांच्या कुटूंबियांनी बुधवारी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. मुरूडमधील शेकापचे ज्येष्ठ कार्यकर्ते तुकाराम पाटील यांच्या हस्ते सर्व कार्यकर्त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी शेकापचे मुरूड तालुका समन्वयक विक्रांत वार्डे, शिघ्रेचे सरपंच गुलाब वाघमारे, श्रीकांत वारगे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व नवनिर्वाचित कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version