हसविण्यासाठी जन्म आपुला

क्लाऊन्स विदाऊट बॉर्डर्सचा यशस्वी उपक्रम; कर्जतच्या कन्येकडे नेतृत्व
। नेरळ । प्रतिनिधी ।
समाजात असे अनेक घटक आहेत कि, त्यांच्या चेहेरीवर हास्य अजिबात नसते. त्यांना हसविण्याचे काम काही संस्था सर्व कक्षा सोडून, वाट मिळेल तिकडे जाऊन, हसण्यासाठी जन्म आपुला असल्यागत काम करतात. क्लाऊन्स विदाऊट बॉर्डर्स या संस्थेचे कार्यकर्ते समाजाच्या उपेक्षित थरातील व्यक्तीना हसविण्याच्या माध्यमातून देश परदेशात प्रयोग करून यशस्वी झाले आहेत. या आगळ्यावेगळ्या ग्रुपचे नेतृत्व कर्जतची कन्या असलेल्या भाग्यश्री प्रभावळकर करीत आहेत. त्यांनी देशात आणि परदेशात हे कार्य सुरु ठेवले आहे.

विदूषकाच्या वेशभूषेत केलेल्या प्रयोगांना क्लाऊनिंग असे म्हणतात. क्लाऊनिंग हा थिएटरचाच एक भाग असून विविध खेळ खेळून, मजेशीर गोष्टी करून, कधी बोलून तर कधी न बोलता ते सगळ्यांना हसविण्याचा काम क्लाऊन्स विदाउट बॉर्डर ही टीम करीत आहे.सामजिक क्षेत्रात काम करणार्‍या मीना प्रभावळकर यांनी समाजातील दुर्लक्षित घटकाच्या जीवनातील दुःख कमी करण्यासाठी क्लाऊन्स विदाऊट बॉर्डर्स या संस्थेची स्थापना केली होती. या संस्थेच्या माध्यमातून संस्थेची भारतातील संस्था प्रमुख म्हणून भाग्यश्री प्रभावळकर करीत असून त्यांनी आपल्या देशात विविध आदिवासी आणि काही रे रिमोट प्लेसेसमध्ये जावून तेथील लोकांना हसविण्याचा आणि त्यांच्या आनंदात काही क्षण वेगळेपण निर्माण करण्याचा प्रयत्न ही संस्था करीत असते.

रुपेश टिल्लू आणि भाग्यश्री दोघे मिळून हे काम पाहतात. देशाच्या विविध भागातील तरुण सहभागी होऊन हसविण्यासाठी जन्म आपुला असा विदूषक पद्धतीचा प्रयोग करीत असतात. त्याचवेळी या क्लाऊन्स विदाऊट बॉर्डर्स या संस्थेत परदेशातील देखील काही तरुण कलाकार सहभागी होतात.

या आगळ्यावेगळ्या ग्रुपचे नेतृत्व कर्जतची कन्या असलेल्या भाग्यश्री प्रभावळकर यांनी देशात आणि परदेशात यांच्याकडून हे कार्य सुरु ठेवले आहे. प्रामुख्याने आदिवासी आणि प्रचंड दारिद्य्र असलेल्या भागात जाऊन आणि वेश्या व्यवसाय चालणार्‍या रेड लाईट विभागात जाऊन भाग्यश्री आणि रुपेश टिल्लू यांनी प्रबोधनातून मनोरंजन करण्याचे कार्य केले आहे. तुर्भे, कामाठीपुरा अशा सेक्स वर्कर्सच्या वस्तीत वर्षातून चार वेळा ते कार्यक्रम घेतात.वाडा, पालघर, रायगड ह्या जिल्यातील अनेक शाळा,वाडीवस्तीमध्ये कार्यक्रम आयोजित केले गेले आहेत. सामाजिक कार्यातून मनोरंजन हे सर्व विदूषकाचे खेळ सर्व कलाकार यांच्यासाठी खूप वेगळा आणि भारावून टाकणारा अनुभव होता.तर ज्यांच्यासाठी सादरीकरण केले जाते त्यांचं राहणीमान, त्यांचं जगणं, त्यांनी निर्माण केलेलं छोटंसं विश्‍व हे खूप जवळून बघण्याची संधी देखील या टीमला मिळत असते.

बांग्लादेशच्या सीमेवर सादरीकरण
हसविण्यासाठी जन्म आपुला असे ब्रीदवाक्य असलेल्या या संस्थेने सदस्य विदूषक पेहेराव करून काही काही अंतरावर सादरीकरण करतात. गेली 10 वर्षे ही टीम काम करीत असून या टीमने नेहमीच सर्वस्तरातील नागरिकांचे मनोरंजन केले आहे. याच उद्देशाने हे सर्व कलाकार एका सामाजिक कार्यातून लहान मुलांना हसवायचं काम करते. क्लाऊन्स विदाउट बॉर्डर्स इंटरनॅशनल या संस्थेअंतर्गत विविध तणावग्रस्त ठिकाणी जाऊन तिथल्या लहान मुलांना आणि तणावग्रस्त लोकांना मजेदार सादरीकरण करून हसवतात. याअंतर्गत ही टीम नुकतीच बांग्लादेश सीमेवर असलेल्या रोहिंग्या रेफ्यूजी कॅम्पला भेट देत तिथल्या स्थानिक लहानग्यांसाठी हसविण्याचा प्रयोग आपल्या ग्रुपच्या वतीने सादर केला. हा उपक्रम स्वीडन शाखा आणि भारत शाखा यांनी मिळून आयोजित केला होता.

Exit mobile version