कार्यकर्ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात सामील
। महाड । प्रतिनिधी ।
शिवसेना उपनेते व पक्षप्रतोद आ. भरत गोगावले यांच्या पिंपळवाडी गावातील वांद्रेकोंड शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार स्नेहल जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला. यावेळी महाविकास आघाडीच्या उमेदवार स्नेहल जगताप यांनी ‘ये तो अभी शुरूवात है, आगे आगे देखिये होता है क्या’ अशा शब्दात शिवसेना आ. भरत गोगावले यांना इशारा दिला आहे.
शिवसेना (उद्धव ठाकरे)पक्षामध्ये यापूर्वी पिंपळवाडीचे उपसरपंच कल्पेश पांगारे यांनी प्रवेश केला असता त्यांना दादागिरी करून त्यांच्या कुटुंबियांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली होती. तरीही या घटनेनंतर या विधानसभा निवडणुकीत स्नेहल जगताप यांनाच पाठिंबा द्यायचा निर्धार पिंपळवाडी वांद्रेवाडीतील मतदारांनी केला.
या शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षप्रवेशावेळी चैतन्य म्हामुणकर, दिलीप दळवी, अपर्णा येरुणकर, गणपत साळुंखे, भाऊ साळुंखे, बंटी चौधरी, दिपाली मोरे, प्रफुल धोंडगे, इम्रान कौचाली, अविनाश चौधरी, तानाजी साळुंखे, जयवंत देशमुख, शहाजी देशमुख, गणेश देशमुख, सेजल तांबडे, संदेश बोबडे, शिवाजी गायकवाड, संतोष चौधरी, अण्णा चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी शिवसेनेचे तसेच आ. गोगावले यांचे कार्यकर्ते अंकुश पवार, अशोक पवार, राजू पवार, संजय शेडगे, मोतीराम शेडगे, भरत वांद्रे, निखिल पवार, ज्योती पवार, पिंका पवार, कौसल्या पवार, रुचिता पवार, अस्मिता वांद्रे, बाबू पांगारे, राहुल पांगारे, वंदना पांगारे, शांताबाई पवार यांनी जाहिररित्या शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षामध्ये प्रवेश केला. या प्रवेश कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदेश बावळेकर यांनी केले. तर, आभार अण्णा चौधरी यांनी केले. या पक्षप्रवेशासाठी उपसरपंच कल्पेश पांगारे आणि बंटी चौधरी यांनी सहकार्य केले.