। महाड । प्रतिनिधी ।
महाड नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव स्नेहल जगताप यांनी नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवत एक हाती सत्ता स्थापन केली होती. स्नेहल जगताप यांनी स्व. माणिक जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आपल्या 5 वर्षाच्या काळात विविध विकास कामे पूर्णत्वास नेली आहेत. कोविड काळामध्ये कोविड सेंटर चालू करत मोफत उपचारदेखील देण्यात आले. तसेच, 2021 च्या महापुरानंतर स्नेहल जगताप यांनी महाडला पुन्हा उभे करण्यासाठी कर्तव्य बजावले होते, असे मत विजया जगताप यांनी महाड शहरातील कोट आळी, कवे आळी आदी भागातील प्रचार दरम्यान केले आहे.
यावेळी विजया जगताप, पुष्पलता जगताप, संध्या जगताप, तृप्ती रत्नपारखी, अस्मिता शिंदे, निता शेठ, सुदेश कळमकर, बंटी पोटफोडे, नानु तांबट, मंगेश देवरुखकर, सुभाष शिरशिवकर, राजू गायकवाड, अक्षय दळवी, लल्ला रत्नपारखी, धुमाळ, निगडेकर, अजय मांगडे, विजय जाधव, अविकुमार धुळे, निलेश वारंगे, संजय पवार, सुभाष शिंदे, उदय दळवी, बाबा शेडगे, उमेश शिंदे, मिरगल, नाना पितळे, कैलास चव्हाण, संतोष पोटसुरे, दिलीप दांडेकर, अभिजीत आरते, यश गांगण, अशोक पवार, सचिन पवारनिनाद, राकेश पाटील, रोहित गोविलकर व शिवसैनिक उपस्थित होते.