पीएनपीमधील विद्यार्थ्यांनी गिरवले बचतीचे धडे
| म्हसळा । वार्ताहर ।
प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमिक शाळा पाष्टी – म्हसळा या शाळेत रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक , शाखा म्हसळा यांच्याकडून स्व. प्रभाकर पाटील यांच्या जयंती निमित्त “ स्वल्प बचत योजने“ अंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांना “ पिग्गी पॉट “ बचत डब्याचे वाटप करण्यात आले.
शाळेतील विद्यार्थ्यांना बचती चे महत्त्व कळावे व त्यांना बचती ची सवय व्हावी. बँकेत स्वताच्या खात्यातील व्यवहार स्वतः करता यावे या उद्देशाने शाळेचे मुख्याध्यापक सुदाम माळी यांच्या प्रेरणेने व विनयकुमार सोनवणे व प्रफुल्ल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम शाळेत राबविण्यात येणार आहे. या प्रसंगी आर. डी. सी. सी . व्यवस्थापक मंगेश मुंडे यांनी बँकेमध्ये चालणारे रोजचे व्यवहार तसेच वेगवेगळ्या प्रकारचे लोन, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, इन्शुरन्स याविषयी सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली.
ऑनलाइन बँकिंग सिस्टीम कशी चालते, याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना त्यामध्ये असणारे धोके आणि विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन वसुली अधिकारी सुरेंद्र शिर्के यांनी केले. विद्यार्थ्यांना बँकिंग क्षेत्रामध्ये असलेले करियर व त्यासाठी लागणारी तयारी याविषयी सुद्धा मार्गदर्शन केले. शेवटी बँकेमार्फत उपस्थित विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना व महिला वर्गाला पेन व खाऊ वाटण्यात आला.
या कार्यक्रमासासाठी रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्यवस्थापक मंगेश मुंडे,वसूली अधिकारी सुरेंद्र शिर्के,विजय पयेर, योगेश करंजकर,विनोद धोकटे,संदेश पाटील व कर्मचारी वर्ग आणि माध्यमिक शाळा पाष्टी शाळेचे मुख्याध्यापक सुदाम माळी, प्रफुल्ल पाटील,बिलाल शिकलगार, ललित पाटील, विनयकुमार सोनवणे, संदीप दिवेकर व विद्यार्थी प्रतिनिधी लविना दुर्गवले व चिराग शिर्के व विद्यार्यांनी विशेष मेहनत घेतली. सदर कार्यक्रमाला शाळा समितीचे अध्यक्ष राजाराम धुमाळ, पाष्टी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष राजाराम दिवेकर, पदाधिकारी शांताराम कांबळे,तुकाराम दिवेकर, कविता दिवेकर, प्रभावती धुमाळ, समीर दिवेकर ,ग्रामस्थ व महिला मंडळ पाष्टी हे मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.