| नेरळ | वार्ताहर |
कर्जत तालुक्यात इनरव्हील क्लब कडून महिलांचे संघटन झाले असून अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवित आहे. मात्र आगामी काळात लोकाभिमुख राबविण्यावर भर देण्याचा निर्धार इनरव्हील क्लबचे नवनिर्वाचित अध्यक्ष सरस्वती चौधरी यांनी केला आहे.अध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारल्यावर आपल्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत केल्या जाणाऱ्या कामाचा रोडमॅप बैठकीत ठेवला आणि सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले.
इनरव्हील क्लब ऑफ कर्जतच्या नवीन 2024-25 वर्षाकारिता नियुक्त झालेल्या पदाधिकारी यांचा पदग्रहण सोहळा आयोजित करण्यात आला होता. रॉयल कॅम्प येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अध्यक्षपदी सरस्वती चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रॉयल कॅम्प येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. इनरव्हील डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट डॉ. शोभना पालेकर यांच्या हस्ते नवीन कार्यकारिणीचे स्वागत करण्यात आले. पदग्रहण समारंभामध्ये इनरव्हील क्लब कर्जतच्या अध्यक्षा म्हणून सरस्वती चौधरी तर उपाध्यक्ष वनिता सोनी, सचिव कश्यापी ठक्कर,कोषाध्यक्ष शिल्पा दगडे यांची होऊन त्यांनी पदग्रहण केले.त्यावेळी संस्थेच्या आईएसओ ज्योत्स्ना शिंदे, मासिकाच्या संपादक मोनिका बडेकर,तसेच मनीषा साबणे, सल्लागार समितीच्या प्राची चौडीये, उत्तरा वैद्य, सुलोचना गायकवाड, करुणा पराडकर तर सदस्या म्हणून उज्वला पाटील, रूपा खणाल, साक्षी अडसुळे, शीतल पाटील, वैशाली मुसळे यांची निवड करण्यात आली.







