अभिनेता अमिताभ दयाल यांचे निधन

। मुंबई । वृत्तसंस्था ।
बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अमिताभ दयाल यांचे वयाच्या 61 व्या वर्षी हदयविकाराच्या झटक्यानं निधन झाले आहे. आपल्या आगळ्या वेगळ्या अभिनयशैलीनं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारे अभिनेते म्हणून अमिताभ दयाल यांची ओळख होती. मोठा संघर्ष करुन त्यांनी वेगळा ठसा हिंदी चित्रपटसृष्टीवर उमटवला होता. त्यांच्या निधनानं बॉलीवूडवर शोककळा पसरली आहे. बॉलीवू़डचे महानायक अमिताभ बच्चन, दिवंगत अभिनेते ओम पूरी यांच्यासोबत अमिताभ दयाल यांनी भूमिका केल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीमध्ये बिघाड झाला होता. त्यामुळे त्यांना एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. अखेर आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. अमिताभ यांनी मराठी दिग्दर्शक मृणालिनी पाटील यांच्याशी लग्न केले होते. त्यांना शिवम आणि अमृता हे दोन मुले आहेत.

Exit mobile version