। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या अलिबागची भुरळ अनेक उद्योजक, फिल्मस्टार आणि क्रिकेटपटूंना पडते आहे. अनेकांचे फार्महाऊस आहेत, यात आता आणखी एका फिल्ममस्टारची भर पडली आहे. लोकप्रिय अभिनेता राम कपूर यांना अलिबाग शहराची भुरळ पडली असून त्यांनी आवास येथे 37 गुंठे जमीन आणि या जागेत एक बंगला देखील खरेदी केला आहे.
राम कपूर यांनी तब्बल 20 कोटींमध्ये 37 गुंठे जमीन आणि बंगला खरेदी केला आहे. राम कपूर आणि त्यांची पत्नी गौतमी कपूर यांनी आज अलिबाग येथील रजिस्ट्रार कार्यालयात ही जागा आपल्या नावे रजिस्टर करून घेतली आहे. त्यांच्या जागेच रजिस्ट्रेशनचे काम अलिबाग येथील वकील महेश म्हात्रे यांनी पाहीले. तर एक कोटी 20 लाख रुपये इतकी स्टॅम्पड्युटी भरली आहे.
या सेलिब्रिटींच्याही अलिबागमध्ये जागा
शाहरुख खान, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, सचिन तेंडुलकर, रणवीर सिंग- दीपिका पादुकोण, विराट कोहली- अनुष्का शर्मा, राहुल खन्ना